मुंबई: धक्कदायक! चॉकलेटचे आमिष दाखवून 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Representational Image (Photo Credits: PTI)

घराबाहेर खेळायला गेले असताना 2 चिमुकल्यांना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार (Sexually assaulted) केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही घटना अॅण्टॉप हिल (Antop Hill) परिसरात बुधवारी घडली. खेळून घरी परतल्यानंतर त्यांना दुखू लागल्याने त्या दोघीही रडू लागल्या. त्यावेळी आईने त्यांच्याकडे विचारणा केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर संबधित पीडितांच्या आईने वडाळा टीटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन हा सर्वप्रकार सांगितला.

चांद शेख (20) असे या घनटेतील आरोपीचे नाव असून भारत कमलानगर परिसरातील तो रहवासी आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित सख्या बहिणी असून त्यापैकी एक 8 वर्षीय तर, दुसरी 9 वर्षाची आहे. बुधवारी पीडिता घराबाहेर खेळायला गेले असताना चांद शेखने त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना एका खोलीत घेऊन गेला. दरम्यान, चांदने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. घरी परतल्यानंतर पीडितला दुखू लागल्याने त्या रडू लागल्या. आईने विचारणा केल्यानंतर चांद दोघींशी केलेल्या अत्याचाराबाबत सांगितले आहे. त्यानंतर पीडितच्या आईने ताबडतोब पोलीस ठाणे गाठून चांद विरोधात तक्रार नोंदवली. हे देखील वाचा- पुणे: शिक्षकाकडून 6 महिन्यांपासून 12 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

वडाळा टीटी पोलिसांनी चांद याला अटक केली असून बाल अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायदा अन्वये त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे पालकवर्गांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.