धक्कादायक! नागपूर येथे महिला डॉक्टरवर ऍसिड हल्ला; आरोपी अटकेत
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-संग्रहित संपादित प्रतिमा)

हिंगणाघाट आणि औरंगाबाद येथील प्रकरण ताजे असताना एका नराधमाने महिला डॉक्टरवर ऍसिड हल्ला (Acid Attack On Female Doctor) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) येथील सावनेर (Savner) परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित डॉक्टर महिला सावनेर येथील पाहिेलेपारजवळच्या कळकळी महाराज मंदिरात असताना आरोपीने तिच्या अंगावर ऍसिड हल्ला केला. दरम्यान महिला डॉक्टर स्वत:चा बचाव करत असाताना त्या ठिकाणी उपस्थित असलेली एक विद्यार्थीसह अन्य महिलाही ऍसिड हल्ल्यात जखमी झाली झाली आहे. डॉक्टरांसह दोघींनाही तात्काळ नागपूर येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

निलेश कन्हेरे असे याप्रकरणातील आरोपीचे नाव आहे. नागपुर येथील मेयो रुग्णालयात काम करणारी महिला करणारी महिला एका सर्वेक्षणासाठी बुधवारी सावनेर येथे आली होती. दरम्यान संबंधित महिला डॉक्टर सावनेर पाहिलेपारजवळच्या कळकळी महाराज मंदिरात गेली असताना, आरोपी निलेश तिच्याजवळ आला आणि तुझा चेहरा खराब करतो, असे म्हणत त्याने तिच्या अंगावर ऍसि़ड हल्ला केला. त्यावेळी महिला डॉक्टरांनी आपला बचाव करायला गेली असताना तिच्या शेजारी असलेली विद्यार्थीनीसह एक महिला जखमी झाली आहे. हा प्रकार घडताना त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी आरोपीला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांनाच्या हवाली केले. महिला डॉक्टरसह अन्य 2 जखमींना नागपूर येथील रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहे. हे देखील वाचा- मुंबई: मानसोपचाराच्या नावाखाली बलात्कार, महिला रुग्णासोबत अनैसर्गिक संभोग केल्याचा आरोप; डॉक्टरला अटक

अरोपीसंदर्भात अधिक माहिती मिळाली नाही. तसेच महिला डॉक्टरवर ऍसिड हल्ला करण्यामागे त्याचा काय उद्देश होता, अद्याप याचेही माहिती समजू शकलेली नाही. नुकतेच हिंगणघाट येथे एका नराधमाने महिला शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले होते. यात पीडिताचा मृत्यू झाला असून संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे.