मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका मानसोपचार तज्ज्ञ (Psychiatrist) असलेल्य डॉक्टराला अटक केली आहे. उपचारासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग, अश्लिल वर्तन आणि तिच्यासोबत अनैसर्गिक संभोग (Unnatural Sex) करत बलात्कार (Rape) केल्याचा आरोप या डॉक्टरवर आहे. मुंबई शहरातील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत पोलिसांनी या मानसोपचार तज्ज्ञास अटक करण्यात आली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेसोबत ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली आहे. आरोपी मानसोपचारतज्ज्ञाची रवानगी सध्या कोठडीत करण्यात आली आहे. संजोय मुकेरजी (Sanjay Murkeji) असे या मानसोपचार तज्ज्ञाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, संजोय मुकेरजी याच्याकडे दोन वर्षांपूर्वी (2018) एक तरुणी मानसोपचार करुन घेण्यासाठी आली होती. त्यावेळी त्याने या तरुणीसोबत हे कृत्य केले. घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित तरुणी ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या त्रस्त होती. तिच्या अवस्थेमुळे कुटुंबीय चिंतेत होते. त्यांनी तिला जवळच्या डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी तिच्या रक्ताची तपासणी करण्यास तसेच शरीराची वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितले. सर्व चाचण्यांचे रिपोर्ट सामान्य आले. त्यामुळे डॉक्टरांनी तिला कोणताही शारीरिक आजार झाला नसल्याचे सांगितले. तसेच, तिच्यावर मानसिक उपचार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले.
दरम्यान, डॉक्टरांनीच सूचवल्याने, पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी ते राहात असलेल्या परिसरातील मानसोपचार तज्ज्ञाचा शोध ऑनलाईन माध्यमातून घेतला. बराच वेळ गूगल सर्च केल्यानंत पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना त्या परिसात संजोय मुकेरजी यांचा दवाखना असल्याचे आढळून आले. त्यानुसार पीडित तरुणीस घेऊन तिचे वडील डॉ. मुकेरजी याच्या दवाखान्यात गेले. दरम्यान, किरकोळ तपासणी करुन आणि संवाद साधून मुरकेजी याने पीडितेला दुसऱ्या आठवड्यात तपासणीसाठी पुन्हा बोलावले. पुढच्या आठवड्यात तरुणी आपल्या आजोबांसोबत मुकेरजी याच्या दवाखान्यात गेली. या वेळी मुरकेजी याने समुपदेशन खोलीमध्ये फक्त तरुणीलाच बोलावले. तसेच, तिच्या आजोबांना खोलीबाहेर बसण्यास सांगितले.
पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, समुपदेशान रुममध्ये एकटीच असलेल्या तरुणीसोबत मुकेरजी याने अश्लील शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच, तिला टॉमबॉय सारखे कपडे न घालण्यास सांगितलं. तिला घट्ट मिठी मारुन जवळ घेतले. त्यानंतर मुकेरजी याने तरुणीला पुढच्या आठवड्यात पुन्हा दवाखन्यात येण्यास सांगितले. मात्र, घडल्या प्रकारामुळे घाबरुन गेलेल्या तरुणीने या डॉक्टरकडे जाण्यास नकार दिला. त्यावर तिच्या घरच्यांनी तिला जबरदस्तीने पुन्हा डॉक्टरांकडे पाठवले. या वेळी मुकेरजी याने या तरुणीसोबत विनयभंग, अश्लिल वर्तन केले. मुकेरजी इतके करुन थांबला नाही तर त्याने प्रकाराची व्हिडिओ क्लिपही काढली. त्यानंतर पीडित तरुणी ही क्लिप डीलिट करावी असे सांगण्यासाठी मुकेरजी याच्याकडे गेली. या वेळी मुकेरजी याने तिच्यासोबत अनैसर्गिक संभोग केला. (हेही वाचा, बायकोला दाखवला पॉर्न; लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याची रवानगी पोलीस ठाण्यात; गुजरात राज्यातील मोठ्या शहरातील घटना)
दरम्यान, पीडित तरुणीने दुसऱ्या एका महिला मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार करुण घेण्यास सुरुवात केली. या मानसोपचारतज्ज्ञास पीडितेने तिच्याबाबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. त्यानंतर या महिला मानसोपचारतज्ज्ञाने घडा प्रकार घरी सांगण्याचा सल्ला पीडितेला दिला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयंनी मुंबई शहरातील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुकेरजी याला 11 फेब्रुवारी या दिवशी अटक केली. दरम्यान, मुकेरजी याच्या फोनची तपासणी केली जाणार आहे. मात्र, ही तरुणी आपल्याला आवडत असल्याचे मुकेरजी याने पोलिसांनी केलेल्या चौकशीवेळी सांगितले असल्याचे समजते.