Jogeshwari Land Scam: 500 कोटींचा कथित भूखंड घोटाळा प्रकरणी आमदार रविंद्र वायकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात
Ravindra Waikar PC ANI

शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते मुंबई जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर (MLA Ravindra Waiker) यांची आज ईडीकडून (ED) चौकशी होत आहे. या चौकशीसाठी रविंद्र वायकर हे ईडी (सक्तवसुली संचनालय) कार्यालयात दाखल झाले आहेत. 500 कोटींच्यी कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकरांची ही चौकशी होत असून  याआधीच्या दोन समन्सला वायकर हे गैरहजर राहिले होते. त्यामुळे आजच्या चौकशीला रविंद्र वायकर हे ईडी कार्यालयात हजर राहणार का? याबाबत शंका होती. (हेही वाचा - ED Summons To Ravindra Waikar: ईडी च्या धाडीनंतर आमदार रविंद्र वायकर यांना 17 जानेवारीला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश)

आज सकाळी 11 वाजता रविंद्र वायकर ईडी कार्यालयात दाखल झाले. या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 जानेवारीला वायकर यांच्या निवासस्थानी आणि मातोश्री क्लबसह वायकरांच्या पार्टनर्स यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर आता तिसऱ्या समन्सला आमदार वायकर हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर बांधकाम केल्याचा आरोप रविंद्र वायकर यांच्यावर आहे. या जागी वायकरांनी बांधलेल्या हॉटेलची किंमत एकूण 500 कोटी रुपये असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.