मुंबईकरांची दाणादाण उडवून आता काही वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतली आहे, असं असलं तरीही पावसामुळे ठिकठिकाणी झालेलं नुकसान अजूनही भरून निघालेलं नाही. एकीकडे पाण्याने तुंबलेले रस्ते, रेल्वेच्या ठप्प सेवा यामुळे अगोदरच मुंबईकर त्रासले आहेत, अशातच आता नेते मंडळींच्या असंबद्ध बोलण्याने नागरिकांचा अधिकच संताप होत असल्याचे समजत आहे. याचेच उदाहरण म्हणजे काही वेळापूर्वी शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना संततधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवर शायराना अंदाजात ट्विट केले होते.यावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विट मध्ये , 'कुछ तो चाहत रही होगी, इन बारिश की बूँदों की भी, वर्ना कौन गिरता है इस जमीन पर, आसमान तक पहुँचने के बाद', अशा ओळी लिहिल्या होत्या . त्यावर चिडलेल्या नेटिझन्सनी राऊत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत संतापही व्यक्त केला.
संजय राऊत ट्विट
कुछ तो चाहत रही होगी
इन बारिश की बूँदों की भी,🌨
वर्ना कौन गिरता है इस जमीन पर
आसमान तक पहुँचने के बाद !
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2019
पहा नेटकऱ्यांचा उपहासात्मक रोष
कुछ तो मजबुरी रही होगी
इन मुंबई में राहनेवलों की भी,
वर्ना कौन चुन के देता है आपको
दरवर्षी इतका तुंबने के बाद ! 😂🙏
— faijal khan (@faijalkhantroll) July 2, 2019
जो आसमान मे पहुचता है वो नीचे आता ही है, चाहे बारीश की बुंद हो या सत्ताधारी!
— Mangesh B. Mhatre (@i_mangeshmhatre) July 2, 2019
बरोबर बोलले "मातोश्रीमध्ये" तळे तयार करण्याची पावसाची ईच्छा होती राऊत साहेब नसता १००% नालेसफाईनंतरही हे कस शक्य आहे नाही का?😁😁😁🌧 pic.twitter.com/FLo4fy1sS7
— प्रकाश गाडे पाटील (@Prakashgadepat1) July 2, 2019
तुंबती है मुंबई हर बार पाऊस मे..
क्या चाहत रही होगी?
टक्केवारी की हाऊस ..आन बाकी कायच काय
— Rofl Gandhi (मराठी) (@RoflGandhi_M) July 2, 2019
जेव्हा रोम जळत होते,
निरो पावा वाजवत होता...
जनाची नाही, मनाची तरी शिल्लक असेल तर मुंबईचे आजचे हाल बघून जबाबदारीने वागा.
— Pratapsinh Patil (@gpekmaratha) July 2, 2019
BMC चे काय ते बघा अगोदर, राउत जी आपणास पाऊसात कविता सुचु लागल्या आहेत आणि आम्ही घरी आहोत कारण मुंबई चे रूपांतर सरोवरात झाले आहे.
धन्य झालो रे पांडुरंगा 😂🙏
— RAJ 💕 (@Rajshine9) July 2, 2019
बेशर्मी की हद है।
पहले मोदी के आगे घुटने टेके, अब मुम्बईकरों की मुसीबतों पर कविता फूट रही है, कहाँ गया मराठा गौरव जिसके लिये बाला साहेब ज़िंदगी भर लड़ते रहे?
— #RSB (@rsb_bharat) July 2, 2019
दरम्यान अशा प्रकारचे वक्तव्य करणारे राऊत हे काही एकमेव नेते नाहीत, काल मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सुद्धा मुंबईत कुठेही पाणी तुंबले नाही असे म्हणत नागरिकांचा रोष स्वतःवर ओढवून घेतला होता. तर आज सकाळी मालाड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर संजय राऊत यांनी पावसाला दोषी ठरवत या मृत्यूंना महापालिका जबाबदार असल्याचे विरोधाकांचे आरोपही खोडून काढले होते.