शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी युपीएच्या (UPA) पुनर्गठनाबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांना अध्यक्ष बनवावे. कारण काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी असे करणे गरजेचे असून पक्षातील नेत्यांनी हे स्विकार करायला पाहिजे असे ही राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवारांना हे सर्वस्वीकार्य असल्याचे म्हणत राऊत यांनी पुढे स्पष्ट केले की. शिवसेना, अकाली दल, टीएमसी सारख्या दलांना सुद्धा युपीए मध्ये सहभागी केले पाहिजे.(Devendra Fadnavis Press Conference: सचिन वाझे, परमबीर सिंग हे छोटी माणसं, त्यांच्यामागचे हात शोधा- देवेंद्र फडणवीस)
टीव्ही चॅनल आज तक वरील एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी पुढे असे ही म्हटले की, संपूर्ण देश आपल्याकडे पाहत आहे. युपीएचे पुनर्गठन झाले पाहिजे. आम्ही एनडीए मध्ये नाही आहोत. अकाली दल नाही किंवा ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसी नाही आहोत. पण असे काही पक्ष आहेत ना एनडीए किंवा युपीएचा भाग आहे. त्यामुळे हे पक्ष युपीए मध्ये का नाहीत हा एक संशोधनाचा विषय आहे.(सचिन वाझे प्रकरणावरुन अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका View Tweet)
युपीएचे अध्यक्ष बदलण्याबद्दल सल्ला देत राऊत यांनी म्हटले की, काँग्रेसच्या पक्षाला मजबूत करायचे असेल तर युपीएला मजबूत करावे. याचे अध्यक्षपद अशा व्यक्तीकडे असावे जो अॅक्टिव्ह असून संपूर्ण देश त्याला स्विकार करेल. त्यावेळीच राऊत यांना विचारले हे पद कोणाला द्यावे तेव्हा त्यांनी शरद पवार यांचे नाव माझ्या समोर येते असे स्पष्ट केले. काँग्रेसने त्यांना स्विकार करावे. पण युपीएच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी आहेत.