Devendra Fadnavis Press Conference: सचिन वाझे, परमबीर सिंग हे छोटी माणसं, त्यांच्यामागचे हात शोधा- देवेंद्र फडणवीस

परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Devendra Fadnavis Press Conference: सचिन वाझे, परमबीर सिंग हे छोटी माणसं, त्यांच्यामागचे हात शोधा- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (Photo Credits: Twitter /ANI)

सचिन वाझे प्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच परमबीर सिंह आणि सचिन वाझे तर, खूप लहान नावा आहे. मात्र, यांच्यामागे कोण बड्या हस्ती आहेत, यांची नावे समोर आली पाहिजे. सचिन वाझेंना वापरणारी माणसे महाविकास आघाडी सरकारमध्ये बसलेले आहेत, असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्ली येथे भाजपा मुख्यालयात एका पत्रपरिषदेला संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, पोलिसांच्या माध्यमातून एखादी गाडी ठेवली जाते. मनसुख हिरेन यांची हत्या केली जाते, अशा घटना महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीही घडल्या नाहीत. मूळ प्रश्न आहे तो एपीआय सचिन वाझे यांना नोकरीत का घेतले गेले? त्यांना सेवेत घेण्याचा प्रस्ताव माझ्याही सरकारच्या काळात आला होता. पण, महाधिवक्त्यांचा सल्ला घेऊन तो प्रस्ताव आम्ही नाकारला. सचिन वाझे हे शिवसेनेत होते, प्रवक्ते होते. शिवसेनेतील अनेक नेत्यांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. हे देखील वाचा- Sachin Vaze Case: सचिन वाझे प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणे यांची मागणी

कोरोनाचे कारण दाखवून सचिन वाझे यांना सेवेत घेतले गेले. हायकोर्टाच्या आदेशाद्वारे निलंबित असताना सुद्धा. अनेक लहान आरोप असलेले कोणतेही अधिकारी सेवेत परत घेतले गेले नाही. सचिन वाझे यांना घेताना थेट क्राईम इंटिलिजन्स युनिटमध्ये नियुक्त केले. सचिन वाझे यांना सीआययू प्रमुख म्हणून नाही तर वसुली अधिकारी म्हणून ठेवले गेले. मुंबईत डान्सबार चालविण्यासाठी खुली सूट आणि सार्‍यांचे प्रमुख सचिन वाझे आहेत. पोलिस आयुक्तांची तर बदली केली.पण, सचिन वाझेंना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

मनसुख हिरेन यांनी गाडी चोरीला गेल्याची जी माहिती दिली, तेव्हा त्यांची तक्रार प्रारंभी घेण्यात येत नव्हती. पण, तेथेही सचिन वाझे यांनी संबंधित पोलिस ठाण्याला फोन करून तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. मनसुख यांची सलग तीन दिवस चौकशी सुद्धा सचिन वाझे यांनीच केली. त्यानंतर त्यांच्याकडून एक तक्रार सुद्धा लिहून घेतली. मनसुख हिरेन यांची हत्या झाली, असे आमचे म्हणणे आहे. या हत्या प्रकरणात एटीएसकडून ज्या पद्धतीची कारवाई अपेक्षित तशी होताना दिसून येत नाही. एटीएस आणि एनआयए यांच्याकडे अशा काही टेप्स आहेत, ज्यात वाझे आणि मनसुख यांचे संभाषण आहे. मनसुख यांच्या हत्येचा तपास सुद्धा एनआयएने घ्यावा, अशी आमची मागणी आहे. हे पोलिसांचे नाही, तर सरकारचे अपयश आहे. सरकार त्यांचा सभागृहात बचाव करीत होती. ज्या उद्देशाने त्यांना सीआययूमध्ये आणण्यात आले, त्याच्या उद्देशाची सुद्धा चौकशी व्हावी, अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2021 06:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).