गिरीश महाजन (Photo Credit : Maharashtra Information Centre)

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस (Maharashtra CM  Devendra Fadnavis) यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शपथ घेतली आहे मात्र अद्याप भाजपला आपले बहुमत सिद्ध करता आलेले नाही, यासाठी येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून मुदत वाढवून देण्यात आली आहे, साहजिकच या मुदतीच्या आधी आमदारांच्या पाठिंब्याची जमवाजमव करण्यासाठी फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र असे करण्याची भाजपला (BJP) वेळच येणार नाही, केवळ अन्य पक्षातील नव्हे तर चक्क शिवसेनेचे (Shivsena)  काही आमदार सुद्धा भाजपच्या संपर्कात आहे असा अप्रत्यक्ष दावा भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माध्यमांशी बोलताना केला. शिवसेनेचे आमदार मागील काही दिवसांपासून संजय राऊत (Sanjay Raut ) यांच्या शाब्दिक अतिसाराला कंटाळले आहेत, आणि म्हणूनच ते भाजपच्या संपर्कात आहेत असेही महाजन यांनी सांगितले.

गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत, भाजपा 170 आमदारांसहित  आपले बहुमत शुद्ध करेल असाही दावा केला आहे. भाजपासोबत हातमिळवणी करताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातील 22 आमदारांचा पाठिंबा घेऊनच हा निर्णय घेतला होता, या आमदारांच्या समर्थनाचे एक पत्र देखील राज्यपाल कोश्यारी यांना पाठवण्यात आले आहे, त्यामुळे निश्चितच भाजपाला 30 नोव्हेंबर पर्यंत दिलेल्या मुदतीत बहुमत सिद्ध करता येणार आहे" असेही महाजन यांनी सांगितले.

ANI ट्विट

Mahrashtra Government Formation Live Updates: अजित पवार यांची पक्षातून हकालपट्टी? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना पत्रकार परिषदेत होऊ शकते घोषणा

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर देवेंद्रफडणवीस यांनी सुद्धा लवकरच बहुमत सिद्ध करून त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे, आता या डावयानुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला नेमके कोणत्या पक्षाचे आमदार पाठिंबा पुरवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.