शिवसेना दसरा मेळावा: नोटबंदीचा निर्णय चुकीचा हे सांगण्याची हिम्मत करणारे उद्धव ठाकरे- संजय राऊत
Sanjay Raut (Photo Credits: Facebook)

ऐन निवडणुकांच्या काळात संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे शिवसेना दसरा मेळाव्याकडे. याच दसरा मेळाव्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत थेट मोदी सरकारच्या काही निर्णयांवर टीका केली आहे.

नोटबंदीच्या निर्णयावर टीका करत संजय राऊत म्हणाले, "नोटबंदीचा निर्णय हा अत्यंत चुकीचा होता. पण तरीही नोटबंदीच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. त्या विरुद्ध आवाज उठवणारा पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे."

इतक्यावरच न थांबता ते म्हणाले, "कलम 370 हटवण्याचं स्वप्न सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. त्यावर अमित शाह यांनी कृती केली."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर ला संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या भाजप आणि शिवसेना महायुतीची घोषणा केली होती.