Kalyan Dombivli Municipal Corporation | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

राज्यातील राजकारणात, शिवसेना आणि भाजप हे दोन विरोधी पक्ष बनले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात (Kalyan Dombivli Municipal Corporation KDMC). कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीमध्ये शिवसेनेला भाजपकडून चांगलाच धक्का मिळाला आहे. परंतु, आता मात्र या वही पक्षांमधील वाढ अजून चिघळलेला पाहायला मिळतोय. केडीएमसी निवडणुकीला आता 7 महिने उरले असताना शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्याच्या कामांवरून एकमेकांविरुद्ध उभे राहिले आहेत.

कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अलीकडेच नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि इतर नगरसेवकांसोबत एक बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर, माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर काही आरोप केले आहेत. ते म्हणाले, “2014 साली रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रशासनाकडून निधीचा वापर केला गेला नसल्याने आजही रस्त्याची कामे रखडली आहेत. शिवसैनिकांच्या दबावामुळे अधिकारी रस्त्यांचे काही काम करत नाहीत.”

कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती निवडणूक 2020: शिवसेनेला धक्का, भाजपचे विकास म्हात्रे विजयी

या आरोपांचे खंडन करत शिवसेनेच्या नेत्या आणि केडीएमसीच्या महापौर विनिता राणे म्हणाल्या, "रस्त्यांचे  काम हे प्रशासनाचे आहे. त्यामुळे पक्षाला दोष देणे अत्यंत चुकीचे आहे. कोणतीही बाब खटकत असल्यास ती आमच्या निदर्शनास आमदारांनी आणून द्यावी. आम्ही जनतेच्या विकासासाठी ते काम नक्कीच पूर्ण करू.”

आता मात्र हे दोन्ही पक्ष येणाऱ्या नगरसेवकांच्या निवडणुकीत काय करतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल.