E Shivneri | Twitter@avaliyapravasi

शिवडी ते न्हावा शेवा हा सीलिंक काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना अर्पण केला आहे. मुंबई आणि नवी मुंबई ला जोडणारा हा पूल प्रवाशांचा वेळ वाचवणार आहे. त्यामुळे आता या मार्गावरून मुंबई-पुणे धावनारी शिवनेरी बस (Shivneri Bus) देखील चालवण्याचा विचार आहे. ABP Majha च्या रिपोर्ट्सनुसार, मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे शिवनेरी बस अटल सेतूवरुन नेण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. या बस सेवेमध्ये आता थांबे काय असतील? टोलचा खर्च किती आणि त्यानुसार शिवनेरी चालवणं किती व्यवहार्य आहे याची माहिती घेतली जात आहे. या सार्‍या विचारानंतर एसटी महामंडळ मुंबई-पुणे शिवनेरी बस अटल सेतूवरुन प्रायोगिक तत्त्वावर चालवण्याचा विचार आहे.

मुंबई पुणे शिवनेरी बस अटल सेतू वर चालवल्यास त्यामुळे तासाभराचा वेळ वाचणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शिवनेरी बसच्या मुंबई-पुणे प्रत्येकी फेऱ्यांमागे एक फेरी अटल सेतूवरुन चालवण्याचा एसटी महामंडळाचा विचार आहे. दादर-शिवडी-अटल सेतू-उलवे- पनवेल-पुणे असा या शिवनेरी बसचा मार्ग असू शकतो. Mumbai Atal Setu: 'लोकांच्या सोयीसाठी बांधलेल्या 'अटल सेतू’वर थांबून फोटो काढणे बेकायदेशीर'; Mumbai Traffic Police यांनी केले नागरिकांना आवाहन .

मुंबई मधून बाहेर पडताना असलेलं ट्राफिक पाहता अटल सेतूच्या मार्गाने पुणे ते दादर हे अंतर वाशी, कळंबोली मार्गापेक्षा पाच किलोमीटरने कमी असल्याने प्रवाशांचा किमान 60 मिनिटांचा वेळ वाचू शकणार आहे. मुंबईतून अटल सेतूवर प्रवेश केल्यास मुंबई-पुणेदरम्यान पनवेल एसटी स्थानक वगळावे लागणार आहे. पनवेलसह अन्य लहान सहान थांबे देखील वगळावे लागणार आहेत. त्यामुळे तेथील प्रवासी या निर्णयाला किती साथ देणार? हे पहावं लागणर आहे.

सध्या मिलिंद देवरा यांनी बेस्टकडे अटल सेतू वरून बस चालवण्यासाठी पाठपुरावा केला आहे. आता एनएमएमटी कडून पुढील आठवण्यात बससेवा अटल मार्गावरून चालवण्याची तयारी झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. या मार्गामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास 20 मिनिटांत शक्य होणार आहे.