Muchhad Paanwala | (Photo Credit - Twitter/ANI)

'मुच्छड पानवाला' (Muchhad Paanwala) दुकानाचा मालक शिवकुमार तिवारी (Shivkumar Tiwari) याला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell ) अटक केली आहे. खेतवाडी (Khetwadi) पोलीस स्टेशन शाखेने ही कारवाई केली. कारवाईत मुच्छड पानवाला याच्याकडे सुमारे 15 लाख रुपयांच्या प्रतिबंधित ई-सिगारेट (e-cigarettes) आढळून आल्या. या सिगारेट्स सह पोलिसांनी तिवारी याला अटक केली.

शिवकुमार तिवारी याला अटक होण्याची पहिलीच वेळ नाही. त्याला यापूर्वी 2021 मध्येही नसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांनी बंदी घातलेल्या ई-सिगारेट्स विरोधात कारवाई कायम ठेवली आहे. या कारवाई अंतर्गत मुंबई पोलिसांनी मंगळवारी (14 फेब्रुवारी ) सुमारे 5.41 लाख रुपयांची अवैध दारु जप्त केली. तसेच, या प्रकरणात दोन संशयीतांना अटक केली. उमर फारुक झुबेर आदम (45) आणि अहमद अब्दुल वहाब शहाल (22) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (हेही वाचा, महाराष्ट्र मध्ये E-Cigarettes वर बंदी; तंबाखू इतकंच ई सिगारेटही आरोग्याला घातक )

प्रसारमाध्यमांनी पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अंमलबजावणी शाखेचे अधिकारी मनोज सुतार यांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. या माहितीवरुन त्यांच्या एका पथकाने जुहू तारा रोड आणि जुहू चर्च रोड येथील दोन दुकानांवर छापा टाकला. खबऱ्याकडून निघालेली माहिती खरी ठरली. या कारवाईत सुमारे 7,700 रुपयांची रोखड आणि इतर काही साहित्य जप्त करण्यात आले. (NCB Arrested Mucchad Paanwala: ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला यांना अटक)

ट्विट

दरम्यान, दोन्ही दुकानदारांना इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा, 2019 आणि सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (कोप्टा), 2003 च्या संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कारवाईत क्रॉफर्ड मार्केटमधील एका दुकानावर छापा टाकून ई-सिगारेट जप्त करण्यात आली होती.