Shivaji University Senate Election 2022: शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर; 14 नव्हेंबरला मतदान, 16 नव्हेंबरला मतमोजणी
Shivaji University Kolhapur | ((Photo Credits: unishivaji.ac.in)

शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर (Shivaji University Senate Election 2022) झाला आहे. प्रभारी कुलसचिवांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या 14 नोव्हेंबरसाठी मतदान पार पडणार आहे तर 16 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल. विद्यमान अधिसभेची मुदत केव्हाच संपली आहे. ही मुदत संपून जवळपास एक महिन्यंचा काळ उलटवा आहे. त्यामुळे अधिसभा निवडणूक जाहीर करावी अशी मागणी होत होती. अखेर विद्यापीठाने अधिसभेसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. जाणून घ्या कसा असेल अधिसभा कार्यक्रम.

मतदानाचा अधिकार कोणाला?

 • प्रभारी कुलसचिवांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाचा अधिकार काही निवडक आणि अधिकृतच मंडळींना प्राप्त होणार आहेत. कोण आहेत अशा व्यक्त?
 • विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या कालावधीमध्ये निवडणुकीसाी नोंदणी करण्यात आलेले पदवीधर (विद्यापीठातील अधिविभाग आणि विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालये आदींमधून पदवी घेतलेले पदवीधर)
 • प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक, या निवडणुकीत निवडणूक लढवू शकतात, मतदान करु शकतात.

  राज्यपाल नियुक्त जागांचा समावेश (हेही वाचा, Shivaji University Kolhapur: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ‘NAAC’ मानांकनात ‘ए-प्लस प्लस’, गुणवत्तेत ठरले महाराष्ट्रात अव्वल)

शिवाजी विद्यापीठाची अधिसभा कशी असेल?

 • महाविद्यालयीन शिक्षक-10
 • नोंदणीकृत पदवीधर-10
 • प्राचार्य-10
 • संस्थाचालक-6
 • शिक्षकेतर कर्मचारी-1
 • विद्यापीठ अधिविभाग, प्रशासन कर्मचारी-1
 • विद्यापीठ प्राध्यापक-3
 • राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी-10
 • विधान परिषद-2
 • विधानसभा-1
 • स्थानिक स्वराज्य संस्था-1

अधिसभा निवडणूक कार्यक्रम

अधिसभा निवडणुकीसाठी 21 सप्टेंबर रोजी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध होईल. 26 सप्टेंबर रोजी तात्पुरत्या मतदारयादीमध्ये वगळलेल्या किंवा चुकीच्या कोणत्याही नोंदीबाबत दुरुस्ती केली जाईल. दुरुस्त केलेली मतदार याती प्रसिद्ध होईल 1 ऑक्टोबर रोजी. लगेच पुढे 6 ऑक्टोबर रोजी जर कोणाला दुरुस्त केलेल्या मतदार यादीसंदर्बात आक्षेप असेल तर त्यावर अपील करता येणे शक्य होईल. अंतिम मतदार यादी 12 ऑक्टोबर रोजी प्रसीद्ध होईल. 14 ऑक्टोबरला निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केली जाईल. 28 ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिवस असेल. त्यानंतर निवडणूक अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 31 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाईल. दाखल केलेले उमेदवारी अर्ज 1 नोव्हेंबरपर्यंत मागे घेतले जातील. उर्वरीत अर्जांबाबत काही आक्षेप असतील तर त्याबाबत 2 नोव्हेंबर पर्यंत कुलगुरुंकडे अपील करता येईल. 3 नोव्हेबर रोजी पात्र असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. प्रत्यक्ष मतदान 14 नोव्हेंबर रोजी पार पडले. तर 16 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.