Sanjay Raut (Photo Credit: ANI)

बिहार मध्ये विधानसभा निवडणूकीची (Bihar Assembly Election 2020) धामधूम सुरू झाली आहे. यामध्ये शिवसेना पक्ष देखील आता निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. या निवडणूकीमध्ये सुमारे 40-50 जागांवर विधानसभा जागांवर शिवसेना (Shiv Sena) आपले उमेदवार उभे करणार आहेत. महाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यसाठी शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्षासोबत आली. आता हा फॉर्म्युला बिहारमध्येही वापरला जातोय का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. त्यावेळेस दोन्ही पक्ष बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तेथे युती करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्यावर आज उत्तर देताना शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी युतीबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे.

बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत येत्या आठवड्यात पाटना मध्ये जाणार आहेत. तेथे ते स्थानिक पक्षांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच पप्पू यादव यांनी देखील भेट घेण्याची इच्छा बोलून दाखवली आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

ANI Tweet

बिहार मध्ये आरजेडी-कांग्रेस (RJD-Congress)विरूद्ध जेडीयू-बीजेपी (JDU-BJP)अशी मुख्य लढत होण्याचं चित्र आहे. पण त्यासोबतच तिसरा मोर्चा उभा करण्याची देखील शक्यता आहे. यामध्ये सथानिक आणि अन्य लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे बिहार विधानसभा निवडणूकींच्या रॅलीजना संबोधित करणार आहेत.

बिहार मध्ये 243 जागांवर 3 टप्प्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. पहिला टप्पा 28 ऑक्टोबर, दुसरा टप्पा 3 नोव्हेंबर आणि तिसरा टप्पा 7 नोव्हेंबर दिवशी होणार आहे. तर मतमोजणी 10 नोव्हेंबर दिवशी होणार आहे.