Shiv Sena (UBT) Official Campaign Song Video: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) पक्षाचे अधिकृत मशाल चिन्ह आणि निवडणूक प्रचार गीत आज प्रदर्शित झाले. मुंबई येथेल आयोजित पक्षकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या वेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलताना ठाकरे यांनी महाविकासआघाडीचा महाराष्ट्रात दणदणीत विजय होईल आणि देशातही सत्तांतर घडेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच, भाजप आणि महायुतीवर सडकून टीका केली.
हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’!
हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’!, असे पत्रकार परिषदेच्या सुरुवातीसच स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. या वेळीत्यांनी या वेळची निवडणूक साधी सोपी नव्हे. देशातील लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असा सामना या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळेल. आमची बाजू ही लोकशाहीची आहे. आम्ही या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजेच 48 जागा जिंकणार असा विश्वासाही उद्धव यांनी या वेळी व्यक्त केला. दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकासआघाडीत निर्माण झालेला तिड्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीचा विषय महाविकासआघाडी आणि शिवसेना (UBT) पक्षासाठी संपला आहे. तिथे उमेदवारही जाहीर झाला आहे. आता बाकीची जबाबदारी काँग्रेसची आहे. विशाल पाटील यांनी सांगलीमध्ये सुरु केलेल्या शक्तीप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते. (हेही वाचा, Uddhav Thackeray Travel By Local: उद्धव ठाकरे यांचा लोकल ट्रेनने प्रवास, बोईसरवरुन ट्रेनने गाठले वांद्रे)
भाजप धूळ गोळा करणारा व्हॅक्यूम क्लिनर
भाजपचा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात पराभव होणार आहे. पराभवाच्या भीतीने भाजपला ग्रासले आहे. म्हणूनच भाजप हा धूळ गोळा करणारा व्हॅक्यूम क्लिनर असतो तसा भ्रष्टाचारी गोळा करत फिरतो आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांचे लांगूनचलन असल्याचा आरोप भाजपद्वारे केला जातो आहे. याबाबत विचारले असता भाजपला मुस्लिम लिगचा जास्त अनुभव आहे. ज्या मुस्लिम लिगने भारताची फाळणी करुन स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. त्यांच्यासोबत भाजपच्या मातृसंस्थेतील नेत्यांचा (शामाप्रसाद मुखर्जी) संंबंध होता. इतकेच नव्हे तर मोदी मिडल इस्टमध्ये मशिदीत गेले, मोहन भागवत यांनीही मशिदीत जाऊन भेट घेतली. त्याच्या अर्थ काय असतो? असा प्रतिसवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
व्हिडिओ
हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत प्रचार गीत. pic.twitter.com/BAQSy6BhFE
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) April 16, 2024
राष्ट्रीय पक्षांनी आपापले जाहीरनामे जाहीर केले याबाबत विचारले असता, महाविकासआघाडीही लवकरच आपला संयुक्त वचननामा जाहीर करेन. काँग्रेसचा जाहीरनामा हा देशभरासाठी आहे. तो सर्वसमावेशक आहे. त्यातूनही काही गोष्टी राहून गेल्या असतील तर आम्ही त्याचा त्यात समावेश करु, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवाय, संयुक्त सभांनाही लवकरच सुरुवात होईल. त्यासाठी जाहीराती तयार करण्याचे काम सुरु असल्याचेही ते म्हणाले.