Uddhav Thackeray, Raj Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने 100 दिवसांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता या ठाकरे सरकारवरवर वचक ठेवण्यासाठी राज ठाकरेंच्या 'मनसे' पक्षातील नेत्यांचं 'शॅडो कॅबिनेट' (Shadow Cabinet 9 मार्च दिवशी त्यांच्या पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर करण्यात आलं. आज शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून मनसेच्या 'शॅडो कॅबिनेट'वर टीका करण्यात आली आहे. 'महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं', असे नमूद करत हे 'शॅडो कॅबिनेट' म्हणजे एक विनोद असल्याचेच अग्रलेखात म्हटले आहे. दरम्यान मनसेच्या 'शॅडो कॅबिनेट'मध्ये ठाकरे विरूद्ध ठाकरे असं समीकरण दिसलं असलं तरीही आजच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये मात्र राज ठाकरे किंवा अमित ठाकरे यांचा थेट उल्लेख टाळण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात 105 आमदारांसह विरोधी पक्षात बसलेल्या भाजपाचा अद्याप बादशाही अंदाज आहे. त्यामध्ये अवघ्या एका आमदारासह विरोधी मनसे 'शॅडो कॅबिनेट' बनवणार हा विनोद ठरू असं म्हणत मनसेची खिल्ली उडवण्यात आली आहे.

दरम्यान मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आमित ठाकरे म्हणजे राज ठाकरेंच्या मुलाची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान ‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा ‘शॅडो’ राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे ‘खेळ सावल्यांचा’ अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं. असे म्हणत अप्रत्यक्षापणे राज ठाकरेंनाही टोला लगावला आहे. मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर: जाणून घ्या अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, अनिल शिदोरे आदी नेत्यांकडे कोणती जबाबदारी.

सामनाच्या टीकेला अमेय खोपकर यांचं प्रत्युत्तर 

‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ‘‘जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.’’ हे बरे झाले, असे म्हणत शिवसेनेने मनसेच्या शॅडो कॅबिनेटची खिल्ली उडवली आहे.