Gulabrao Patil On Milind Narvekar: उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबराव पाटील यांचे खळबळजनक विधान
Uddhav Thackeray, Milind Narvekar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या आक्रमकतेमुळे शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटातील आमदारही आता आक्रमक होऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे सुरु असतानाच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सेवक चंपासिंग थापा शिंदे गटात आले. त्याचप्रमाणे आता त्यांचे स्वीय सहायक मिलिंद नावर्वेकर (Milind Narvekar) हेसुदधा शिंदे गटात येत आहेत, असा गौप्यस्फोटच गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख 'गद्दार' असा केला जातो आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळते आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या शिवसेनेवर प्रतिहल्ला करताना शिंदे गट आक्रमक झाला असून आपलीच बाजू भक्कम असल्याचा त्यांच्याकडून पुरेपूर दावा केला जातो आहे. धुळे येथील एका सभेत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, आज आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला जातो आहे. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सेवक चंम्पासिंग थापा त्यांना सोडून आला. आता त्यानेही खोके घेतले होते का? याच वेळी गुलाबराव पाटील यांनी पुढे दावा केा की, उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंद गटात सहभागी होतील. (हेही वाचा, Champa Singh Thapa: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहाय्यक चंपासिंह थापा यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश)

मिलींद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पाठिमागील अनेक वर्षांपासून ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत आहेत. त्यांचे सर्वच पक्षांतील नेत्यांशी जवळचे आणि घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्यांना अजातशत्रू म्हणूनही ओळखले जाते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या गणपती उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलीद नार्वेकर यांच्या घरी उपस्थिती दर्शवली होती. ते नार्वेकर यांच्या घरी दरवर्षीच दर्शनासाठी जात असले तरी या वेळी त्याची काहीशी अधिक आणि राजकीय अंगाने चर्चा झाली.

दरम्यान, चंपासिंह थापा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात. ते बाळासाहेबांची सेवा करत. बाळासाहेबांची औषधे, जेवण आणि दौऱ्यांदरम्यान घेतली जाणारी काळजी याची जबाबदारी थापा यांच्याकडे असे. बाळासाहेबांच्या अनेक दौऱ्यांमध्ये थापा त्यांच्यासोबत पाहायला मिळे, असे जुने शिवसैनीक सांगतात.