Champa Singh Thapa |

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सहाय्यक अशी ओळख असलेले चंपासिंह थापा (Champa Singh Thapa) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहेत. अनेक जवळच्या व्यक्तींनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत बंड केले. त्यामुळे एकाकी पडलेल्या उद्धव ठाकरे यांना पक्ष सावरण्याचे आव्हान असतानाच शिंदे गट 'मातोश्री'ला वारंवार धक्के बसत आहेत. थापा यांच्या शिंदेगटासोबत जाण्याने उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.

एकानथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर सेनेचे जवळपास 40 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात गेले. त्याची परिणीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेले महाविकासआघाडी सरकार कोसळण्यातही झाले. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तातरानंत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमत्री पदाची शपथ घेतली आणि नवे सरकार राज्यात सत्तेत आले. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे की, आम्हीच खरी शिवसेना आहोत. या दाव्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची? हा महत्त्वपूर्ण सवाल उत्पन्न झाला आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणुक आयोगाकडे प्रलंबीत आहे. या प्रकरणाचा निकाल काय लागतो यावर शिवसेना उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. (हेही वाचा, https://marathi.latestly.com/maharashtra/shiv-bhojan-thali-the-shiv-bhojan-thali-scheme-launched-by-the-thackeray-government-is-likely-to-be-closed-shinde-fadnavis-government-will-review-406878.html)

ट्विट

दरम्यान, चंपासिंह थापा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात. ते बाळासाहेबांची सेवा करत. बाळासाहेबांची औषधे, जेवण आणि दौऱ्यांदरम्यान घेतली जाणारी काळजी याची जबाबदारी थापा यांच्याकडे असे. बाळासाहेबांच्या अनेक दौऱ्यांमध्ये थापा त्यांच्यासोबत पाहायला मिळे, असे जुने शिवसैनीक सांगतात.