राम मंदिर बनणार म्हणजे बनणार, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांची भुमिका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य-ANI)

आज (16 जून) शिवसेना (Shiv Sene)  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेतील 18 खासदार सुद्धा उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांसह पवित्र रामजन्मभूमीमधील रामलल्लांचे दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

तर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून पहिले मंदिर फिर सरकार याचा नारा लगावला जात होती. त्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला जाणार आहे. तसेच मंदिरासाठी अध्यादेश काढून या पवित्र रामजन्मभूमीवर कायद्याने मंदिराची उभारणी करावी. इथे राममंदिर उभे रहावे ही लोकांची इच्छा असल्याने येथे हिंदूंची एकता कायम राहायला हवी असे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

(शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 18 खासदारांसह थोड्याच वेळाच रामलल्लांचे दर्शन घेणार)

त्यामुळे येत्या काळात राम मंदिर बनणार म्हणजे बनणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तर प्रथम मंदिर आणि नंतर संसद अशी भुमिका शिवसेनेने पार पाडली आहे. त्याचसोबत शिवसेनेने दुष्काळामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त काम केले असून विरोधकांनी याबद्दल काय कार्य केले असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. रामजन्मभूमी ही अशी जागा आहे जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते असे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेवेळी म्हटले आहे.