शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात आजही चांगले संबंध आहेत. परंतू, हे संबंध एका ठिकाणी आणि राजकारण एका ठिकाणी आहे, असे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला. या वेळी संजय राऊत बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांचे संबंध, शरद पवार यांच्यासोबत झालेली राऊत यांची भेट, देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान याबाबत प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात दिल्ली येथे (8 जून) 40 मिनीटे चर्चा केली. याचा अर्थ असा लावू नये की, आगामी काळात शिवसेना-भाजप सत्ता येईल. आमचे मार्ग आता वेगवेगळे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यात आजही चांगले संबंध आहेत. परंतू, व्यक्तीगत संबंध वेगळे आणि राजकारण वेगळे आहे. (हेही वाचा, Mann ki Baat: कोविड-19 लस घेण्यास संकोच करु नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन)
शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांच्यासोबत झालेली ही व्यक्तीगत भेट होती. अशी भेट अनेकदा होत असते. अशा भेटीचे राजकीय अर्थ काढले जाऊ नयते.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच म्हटले होते की, ''भाजपाची सत्ता आल्यास ओबीसी आरक्षण मिळवून देऊ शकलो नाही, तर संन्यास घेईन''. फडणवीस यांच्या विधानावरुन फिरकी घेत एखाद्या राजकीय पक्षाला असे विधान करावे लागते हे त्याचे वैफल्य आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे.