Sanjay Raut Criticizes Narayan Rane: नारायण राणे यांना अजूनही 'या' नावाने ओळखतात; संजय राऊत यांचा टोला
Sanjay Raut, Narayan Rane (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या महापुरानंतर भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्यातील पूरग्रस्त भागांचे दौरे केले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर विविध मुद्द्यावरून टीका केली होती. या टीकेला शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संसदेत अनेक खासदार आहेत. मात्र, शिवसेनाच्या खासदारांची एक वेगळी ओळख आहे. शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला, तरी त्याची ओळख शिवसैनिकच असते. त्यात बदल होत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाराणय राणे यांना टोला लगावला आहे.

अहमदनगर दौऱ्यावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. संसदेत अनेक पक्षांचे खासदार येतात. त्यापैकी बऱ्याच खासदारांना कोणी ओळखत नाही. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. जर कोणी पक्ष सोडून गेला तरी, शिवसैनिक हीच त्याची ओळख राहते. हा नारायण राणे...तो आमका असे बोलत नाहीत. तो शिवसैनिक आहे, असेच म्हटले जाते. तुम्ही कुठेही जा, लोक तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखतात. आमदार, खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही. सत्ता हा मानसिक आधार आहे, असे म्हणत राऊत यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. हे देखील वाचा- राज कुद्रा याने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून 300 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा भाजप नेते राम कदम यांचा दावा

शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी मवाली, गुंड म्हटले तरी चालेल. वाघासारखे जन्माला आलो आहोत, वाघासारखेच मरणार...असे संजय राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे.