महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून वेगवगेळ्या मुद्यांवरून चर्चा सुरू असून, राज्य सरकारवर टीका केली जात आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने अनेकदा वादग्रस्त विधान केले आहेत. याचदरम्यान, कंगनाने महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. याच मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Ranaut) यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, आम्ही अपमान विसरलेलो नसून वेळ आली की नक्की सांगू , अशा शब्दात त्यांनी कंगना रनौतवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची पत्रकार आशुतोष यांनी नुकतीच मुलाखत घेतली आहे. या मुलाखातीत आशुतोष आणि संजय राऊत यांनी अनेक राजकीय मुद्द्यावर चर्चा केली. दरम्यान, आशुतोष यांनी कंगनाचे नाव घेत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर होत असलेल्या टीकेबद्दल प्रश्न उपस्थित केला. यावर संजय राऊत संजय राऊत म्हणाले की, शिवसेना कुमकुमत झालेली नाही. माझ्यावर 140 पेक्षा अधिक खटले सुरु आहेत. आम्ही घाबरणारे लोक नाहीत आणि यापुढेही घाबरणार नाही. सत्ता येते आणि जाते. सत्ता घेऊन कुणीही येत नाही. सगळ्यांना जावे लागणार आहे. मात्र, जे आमच्यावर भुकंत आहेत, त्यांनाही माहिती आहे. भीती तर त्यांच्या मनात आहे. ते फक्त वरून दाखवत आहेत. पण, जेव्हा वेळ येईल, तेव्हा नक्की सांगू. आम्ही अपमान विसरणार नाही. हा महाराष्ट्र आहे,” असे उत्तर देत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला आहे. हे देखील वाचा-Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणूकसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या 'बिस्कीट' या चिन्हाच्या निर्णयावर शिवसेनेचा आक्षेप
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना विरुद्ध कंगना असा वाद रंगला होता. याच पार्श्वभूमीवर कंगना राणावत हिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम कामावर मुंबई महानगरपालिकेने कारवाईत केली होती. तसेच नोटीस बजावण्याचा 24 तासांचा कालावधी पूर्ण झाल्यावर मुंबई मनपाने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला होता. यात शिवसेने पक्षाचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी त्यावेळी केला होता.