शिवसेना (Shiv Sena) आमदार रविंद्र वायकर(Ravindra Waikar) यांची मुख्यमंत्री कार्यालयात (CMO Office) मुख्य समन्वक अधिकार पदी (Chief Coordinator) निवडण करण्यात आली आहे. तर वायकर यांची नाराजी दूर करण्यासाठी खास कॅबिनेट दर्जाच पद निर्माण करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर वायकर यांनी त्यांची प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या नव्या जबाबदारीमुळे आपण आनंदी आणि समाधानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी नेहमीत प्रयत्नशील राहणार असल्याचे ही वायकर यांनी म्हटले आहे.उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये रविंद्र वायकर यांना स्थान देण्यात आले नव्हते.
मुख्यमंत्री कार्यालयात एका मंत्र्यांची नियुक्ती करण्यासाठी विचार उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत होता. यासाठी शिवसेनच्या घोटातील अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा होती. पण नाराज असलेल्या वायकर यांचे अखेर मुख्यमंत्री कार्यालयात पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र वायकर यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेतील अन्य आमदार आणि अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यात 'आपला दवाखाना' चे लोकार्पण; जाणून घ्या काय आहे संकल्पना)
Shiv Sena MLA Ravindra Waikar has been appointed as Chief Coordinator for Maharashtra Chief Minister's Office. He will hold rank of Cabinet Minister pic.twitter.com/h5ej0CRQpG
— ANI (@ANI) February 8, 2020
वायकर यांच्या नियुक्तीमुले शिवसेनेमधील आमदरांच्या कामाला गती मिळणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना भेटता न येणाऱ्या म्हणणाऱ्या आमदारांना तक्रार करता येणार नाही आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री कार्यालावर कोणताही आरोप झाल्यास त्याचा ठपका थेट उद्धव ठाकरे यांच्यावर ठेवता येणार नाही आहे. यापूर्वी वायकर यांनी मुंबई महापालिकेत स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाचे कामकाज पाहिले असून त्यांना प्रशासकीय कामांचा तगडा अनुभव आहे.