Shiv Sena Leader Sanjay Raut meet Governor Bhagat Singh Koshyari | ( Photo Credits: ANI)

राज्यातील सरकार स्थापनेत शिवसेना (Shiv Sena) कोणत्याही प्रकारचा अडथळा आणत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. संजय राऊत, रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्ठमंडळ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर संजय राऊत (Sanjay Raut) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी एका मर्यादेत राऊन आपण राज्यपालांशी चर्चा केली, असे राऊत यांनी सांगितले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत या वेळी म्हणाले की, शिवसेनेने राज्यपालांची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती. या भेटीत राज्यातील राजकीय सध्यस्थितीबाबत चर्चा केली. राज्यपाल पद हे पक्षनिरपेक्ष पद आहे. त्यामुळे ते कोणत्याही पक्षाचे असत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी एका मर्यादेत राहून चर्चा केली. तसेच, राज्यातील राजकीय स्थितीबाबत माहिती दिल्याचेही राऊत यांनी सांगितल्याचे राऊत यांनी म्हटले. (हेही वाचा, सत्तासंघर्ष 2019: मुख्यमंत्रीपद वगळता शिवसेनेला 16 मंत्रीपदं देण्यास भाजप तयार: सूत्र)

एएनआय ट्विट

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची आज राजधानी दिल्लीत चर्चा सुरु आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दैऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तर, शरद पवार हे काँग्रेस पक्ष हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या या बेठीमधील तपशील विस्ताराने अद्याप बाहेर आला नाही. मात्र, नजीकच्या काळात या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालथ झाल्याचे पाहायला मिळू शकते.