Ramdas Kadam on Anil Parab | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अनिल परब हे शिवसेना (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या घषात घालायला निघाले आहेत असा खळबळजनक आरोप करत 'शिवसेनेचा गद्दार मी नव्हे तर अनिल परब आहे' असेही म्हटले आहे. रामदास कदम हे शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिवसेनेच्याच एका नेत्याने आपल्याच पक्षाच्या मंत्रीपदावर असलेल्या नेत्यावर आक्रमक शब्दात टीका करवी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रामदास कदम (Ramdas Kadam on Anil Parab) हे पाठीमागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चाही सुरु आहे. रामदास कदम हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

रामदास कदम यांनी पक्षातील नेत्याविरोधात बोलल्याने कारवाई केली तर तुमची भूमिका काय असेल असे पत्रकारांनी विचारले. यावर आपली भूमिक स्पष्ट करत म्हणाले की, मी कुठेच पक्षाच्या विरोधात बोललो नाही. मी केवळ अनिल परब यांच्यावर बोललो आहे. जर अनिल परब म्हणजेच पक्ष असेल तर आम्ही कायमचं घरी बसू. त्याला काही ईलाज नाही. अनिल परब म्हणजेच शिवसेना असे असेल आणि रामदास कदम यांचे शिवसेनेसाठी काहीच योगदान नसेल अशी भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याला कोण काय करु शकतं? असे प्रश्नार्थक उद्गारही रामदास कदम यांनी या वेळी काढले. (हेही वाचा, Bala Nandgaokar 'मनसे' ला रामराम ठोकत शिवसेना मध्ये परतणार? पहा सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेल्या मेसेज वर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया)

जेव्हा मी संघर्ष करत होतो तेव्हा अनिल परब कोठे होता? हाच परब हा शिवसेनेचा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घशात घालायला निघाला आहे. त्यामुळे शिवसेनेचा गद्दार मी नव्हे अनिल परब आहे. जर घोषणाच द्यायच्या असतील तर अनिल परब याच्याविरोधात द्या, असेही रामदास कदम म्हणाले. मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. कडवट शिवसैनिक आहे. मी कधीही स्वत:ला डाग लावून घेतला नाही. तुमची व्यक्तीगत मालमत्ता म्हणजे शिवसेनेची नव्हे. तुमच्या हॉटेलवर बोलणे म्हणजे शिवसेनेवर बोलणे नव्हे. अनिल परम म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख नाही. उगाच माझ्यावर गद्दारिचा शिक्का लावण्याचा प्रयत्न करु नका, असेही परब म्हणाले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत रामदास कदम यांनी सांगितले की, अन्याय किती सहन करायचा याला देखील मर्यादा असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माझी हात जोडून विनंती आहे की, तुम्ही स्वत: यामध्ये लक्ष घाला. अनिल परबच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याचे पाय जमिनीवर नाही. त्याचे पाय पुन्हा जमिनीवर आणा. मी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल परबला हरामखोर म्हटलेलं आहे. त्याला हरामखोराला थांबावा, याला मंत्रीपद दिलं ते नेत्यांना संपवण्यासाठी नाही तर शिवसेना वाढवण्यासाठी दिलेलं आहे, असं त्या पत्रात लिहिलेलं होतं. या माझ्या भावना आहेत' असेही आपण पत्रात म्हटल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.