Yashwant Jadhav IT Raid: यशवंत जाधव यांच्या घरी 24 तासांनंतरही आयकर विभागाची छापेमारी सुरूच
Shiv Sena leader Yashwant Jadhav | (Pic Credit - ANI)

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना (Shiv Sena) नगरसेवक यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर सुरु असलेली आयकर विभागाची (Income Tax) छापेमारी अद्यापही सुरुच आहे. काल (25 फेब्रुवारी) सकाळी सात वाजलेपासून आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर 24 तास उलटून गेले तरी अद्यापही (26 फेब्रुवारी 2022)) ही कारवाई सुरुच आहे. त्यामुळे या कारवाईबाबत मोठी उत्सुकता आहे. यशवंत जाधव हे मुंबतील शिवसेनेचे एक प्रभवी नेते आहेत. शिवाय ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचेही मानले जाते.

यशवंत जाधव यांच्यावर भाजप नेत्यांनी भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या विरोधात आयकर विभागाकडे तक्रारीही केल्या होत्या. त्यानंतर आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर छापेमारी केली. आयकर विभागाची कारवाई प्रदीर्घ काळ सुरुच राहिल्याने सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, या कारवाईत जाधव यांच्याकडून आयकर विभागाला काही अनधिकृत अथवा बेकायदेशीर मालमत्ता, माहिती मिळाली किंवा नाही याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. (हेही वाचा, BMC: मुंबई महापालिका गटनेते यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी; शिवसेना नगरसेवक रडारवर असल्याची चर्चा)

यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडल्यानंतर शिवसेनेमध्ये जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळाली. दरम्यान, आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांना घेऊन जाणार असल्याची माहिती पसरली. त्यामुळे शिवसैनिक जोरदार आक्रमक झाले. त्यांनी यशवंत जाधव यांच्या घराबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली.