Kirit Somaiya on Arjun Khotkar: किरीट सोमय्या यांचा 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, शिवसेना नेते अर्जून खोतकर यांच्याकडून रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा
Arjun Khotkar on Kirit Somaiya | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा (Rs 100 Crore Scam) केल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) नेते अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावरुन बोलताना खोतकर यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेच त्यांचे बोलवते धनी असल्याचे खोतकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, 'आपण किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद अद्याप पाहिली नाही' असेही खोतकर यांनी सांगितले. या वेळी खोतकर यांनी रावसाहेब दानवे आणि किरीट सोमय्या यांचा एकमेकांसोबतचा फोटो दाखवला.

किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारीच अशा प्रकारचे घोटाळे करु शकतात. त्यामुळे अर्जून खोतकर आणि तापडिया यांनी संगनमताने म्हणजे मिलीभगत करुन कारखान्यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला. कारखान्याची 100 एक जमीन हडपण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरु आहे. या ठिकाणी एक मोठा कॉम्प्लेक बांधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी खोतकरांवर केला आहे. शरद पवार यांचा ईडी अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी, हायकोर्ट आणि भाजपला धमकी देण्याचा उद्देश असल्याचेही सोमय्या म्हणाले. (हेही वाचा, Kirit Somaiya Criticizes Ajit Pawar: आयकर विभागाच्या कारवाईनंतर किरीट सोमय्या यांची अजित पवार यांच्यावर टीका)

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळून लावले आहेत. किरीट सोमय्या यांचे बोलवते धनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असल्याचेही खोतकर यांनी म्हटले आहे. मी कारखान्याचा मालक नाही. केवळ भागधारक आहे. कारखाना जर शंभर कोटी रुपयांचा असेल तर कारखान्याच्या मालकाला बोलावून तो कारखाना किरीट सोमय्या यांना शंभर कोटी रुपयांमध्ये द्यायला लावू, असे खोतकर यांनी म्हटले. मात्र, आपण सोमय्या यांची पत्रकार परिषद अद्याप पाहिली नसल्याचेही खोतकर यांनी सांगितले.

ट्विट

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव घेतले आहे. त्यामुळे खोतकर यांनी केलेल्या आरोपावर आता रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया काय येते याबाबत उत्सुकता आहे.