Ambadas Danve PC FB

Ambadas Danve Suspended: विधान परिषदेतील (Vidhan Parishad) विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. विधानसभेतून पुढील पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विधान परिषदेत शिवीगाळ केल्यामुळे दानवे यांना निलंबित करण्याचा संसदीय कार्यकारी चंद्राकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला संसदेकडून मंजूरी मिळाली. (हेही वाचा- उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी; दाखल केला अर्ज)

दानवे सभागृहात नेमकं काय म्हणाले ? पाहा व्हिडिओ 

मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी प्रसाद लाड  यांनी अंबादास दानवे यांच्यावर अपशब्द वापरल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर दानवे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी उपसभापतींनी केली होती. दानवे यांच्यावर निलंबनाची कडक कारवाई केल्यानंतर विधान परिषदेत प्रचंड गदारोळ उडाला होता. एकीकडे विरोधी पक्ष नेते आक्रमक झाले होते.

प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया 

अंबादास दानवे यांनी अनपेक्षित शब्दाचा वापर केल्यामुळे प्रसाद लाड यांनी त्यांचा निषेध केला आहे. माध्यमांशी बोलताना प्रसाद लाड यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी यावरून प्रतिक्रिया दिली आहे. अश्या प्रकारचा प्रस्ताव या आधी कधीच मांडता आला नाही. अत्यंत असभ्य आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर सभागृहात केला असं फडणवीस यांना माध्यमांसमोर सांगितले.