तमाम महाराष्ट्रात ज्या ज्या लोकांच्या जागा चुकल्या असतील त्यांची मी माफी मागतो. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक शिवसैनिक हवा. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावर अनेक नेते आमच्याकडे आले, त्यांना शिवसेनेशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. त्यांना आमदारकी-खासदारकी नको होती त्यांना फक्त त्यांच्या समाजाचा विकास हवा होता, सत्तेत आल्यावर जो आम्ही करणार आहोत. आम्ही उतणार नाही, मातणार नाही घेतलेला वसा सोडणार नाही.
शिवसेना दसरा मेळावा: राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने पहिल्यांदा आपला नेता ठरवावा- उद्धव ठाकरे
shiv sena dussehra rally 2019दसऱ्याच्या मुहूर्तावर पार पडणारा शिवसेनेचा दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामधील महत्वाचा भाग आहे. दरवर्षी दसऱ्याला बाळासाहेब ठाकरे शिव तीर्थावरून शिव सैनिकांना मार्गदर्शन करीत असत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा सुरु ठेवली. यावर्षी विधानसभेच्या रणधुमाळीत हा दसरा मेळावा पार पडणार आहे, त्यामुळे ठाकरे परिवारातील सदस्यांच्या भाषणाची उत्सुकता अजूनच वाढली आहे. युतीमध्ये मिळालेल्या कमी जागा, आरे कॉलनीमधील झाडे तोडल्याने निर्माण झालेला वाद यावर उद्धव ठाकरे भास्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केला जात आहे.
मुंबईमधील शिवाजी पार्क येथे हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.