Shiv Sena On BJP: दादा, दचकू नका! अजित पवार यांनी भींतीवर गजरचे नव्हे टोल्यांचे घड्याळ लावले आहे; चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचा टोला
Chandrakant Patil, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात नुकतीच एक भेट झाली. या भेटीनंतर 'राज्यात सत्तेत असलेले महाविकासआघाडी सरकार पाडण्यात भाजपला रस नाही. हे सरकार त्यांच्यातील आंतर्विरोधाने पडेल, असे भाकीत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. त्यावरुन फिरकी घेत शिवसेना मुखपत्र दैनिक सामना (Saamana Editorial) संपादकीयातून चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावण्यात आला आहे. पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. 'दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात 'पहाट' योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त, कोणी मांडू नयेत. असे सांगतानाच अजित दादांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घड्याळ भिंतीवर लावले आहे व ते टोले सतत वाजत असतात. या टोल्यांच्या आवाजाने दादांची पाहाट खराब होत असेल तर तो त्यांचा प्रश्न', असा टोलाही संपादकीयातून लागावण्यात आला आहे.

'वन फाईन मॉर्निंग... दादा दचकू नका!' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, 'राज्याच्या राजकारणात 'वन फाईन मॉर्निंग' अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तवल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वैगेरे बरी आहे ना?त्यांना नीट झोप वैगेरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाईन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. चंद्रकांतदादांना फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असे वाटते. हे काही चांगल्या प्रकृतीचे 'साइन' नाही. देवेंद्र फडणीस व संजय राऊत यांच्या अचानक भेटीनंतर जो गदारोळ झाला ते काही गदारोळ झाला त्यामुळे एखाद्या फआईन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवाता येईल असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत'.

'एकतर अशा फाइन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. एकतर अशा फाईन मॉर्निंगचा अचाकन प्रयोग भाजपने या आधी केलाच आहे. पण त्या फाइन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या 72 तासात दुरुस्त झाले. याचे भान सध्या फक्त श्री, देवेंद्रबाबूंनाच आहे. दवेंद्र फडणवीस यांच्या मनातही नाही, पण चंद्रकांतदादांना पहाटे पहाटे सध्या जाग येत आहे. त्यांची झोपमोड होते की, ते दचकून गचकन जागे होतात यावर पुढचे बरेच काही अवलंबून आहे', असा टोला सामनातून चंद्रकांत पाटील यांना लगावण्यात आला आहे. (हेही वाचा,Coronavirus: कोरोना पुढे, देश मागे हेच वास्तव; केंद्र सरकारचे फक्त वादे, दावे- शिवसेना )

या लेखात पुढे म्हटले आहे की, 'आजच्या घडीला विधानसभेची मद्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे. असा अध्यात्मिक विचारही दादांनी पहाटेनंतरच्या सूर्योदयास मांडला आहे. म्हणजे या मंडळींच्या डोक्यात काहीतरी वळवळते आहे. मध्यावधी निवडणुकांची भाकीते करुन त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर 'घड्याळा'चे काटे कतिमान आहेत. आणि या वेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्रीबाळगा. सोबतीला हात आहे. हातावर घड्याळ आहे. व घड्याळातून पहाटेचा गजर काढून टाकला आहे. अजित दादांना आता गजरचे नाही तर टोल्यांचे घड्याळ भिंतीवर लावले आहे. व ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळे सगळेच 'जागते रहो'च्या भूमिकेत आहेत. टोल्यांच्या आवाजामुळे भाजपच्या दादांची पहाट खराब होत असेल तर तो त्यांचा प्रश्न',असे सामना संपादकीयात म्हटले आहे.