शिवसेनेच्या फूटीनंतर शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि त्याची निशाणी धनुष्यबाण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे सोपावली आहे. या निर्णयावरून ठाकरे गट सध्या आक्रमक झाला आहे. आज खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी या प्रकरणी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या माहितीनुसार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदे गटाकडे सोपावण्यासाठी आत्तापर्यंत 2 हजार कोटी रूपयांचा सौदा झाला आहे. खोक्यातून सत्तेत आलेल्या सरकारमध्ये विभागनुसार आमदारांना पैसे घेऊन विकत घेतलं तर पक्षासाठी किती पैसा खर्च केला असेल? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
दरम्यान काही बिल्डरांनी हा सौदा केला असून भाजपाच्याच काही जवळच्या लोकांकडून ही माहिती समजली असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. भविष्यात अजूनही बऱ्याच गोष्टी उघड होतील असं ते म्हणाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला नाही तर त्यासाठी व्यवहार झाला आणि सौदा विकला असल्याचं त्यांनी म्हणत पुन्हा यंत्रणांवर टीका केली आहे. नक्की वाचा: Shiv Sena Crisis: मातोश्री बाहेर कार्यकर्त्यांच्या गराड्यात उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांना आव्हान; मर्द असाल तर 'चोरलेल्या शिवधनुष्यासह' निवडणूकीच्या रिंगणात उतरा .
#WATCH शिवसेना और उसका निशान (तीर-कमान) चिह्न छीना गया है और ऐसा करने के लिए इस मामले में अब तक 2,000 करोड़ रुपए की लेनदेन हुई है: उद्धव ठाकरे गुट के नेता व सांसद संजय राउत, मुंबई pic.twitter.com/6hyQHLjMZr
— ANI_HindiNews (@AHindinews) February 19, 2023
उद्धव ठाकरे यांनी काल कलानगर मध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना शक्य झाल्यास फेसबूक लाईव्ह करून नेमके कोणकोणते पुरावे सादर केले याची माहिती देणार असल्याचं म्हटलं आहे.