शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी राम मंदिर प्रकरणी अयोध्येचा दौरा केला होता. त्यानंतर राजकीय पक्षात त्याचे विविध पडसाद उमटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे असे विधान केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन आलो म्हणजे राम मंदिराचा विषय वाऱ्यावर सोडला नाही असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राम मंदिराबाबत न्यायालयाकडे बोट दाखवू नये. तर हे प्रकरण कायदा करुन सोडवावा लागेल अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेना नेहमी दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभी राहिल असे ही विधान उद्धव ठाकरे यांनी केली आहे.( हेही वाचा- दंगलीबाबत माहिती असल्यास पोलिसांना कळवा, शिवसेनेचा राज ठाकरे यांना टोला)
राम मंदिर येथे जाऊन आलो म्हणजे हा विषय सोडून दिला नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. तर राम मंदिर प्रकरण हे कायदा करुनच सोडवावा लागेल असे ही त्यांनी सांगितले. मात्र झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. तर येत्या 24 डिसेंबरला पंढरपुर येथे सभा घेणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.