शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) औरंगाबाद (Aurangabad) विमानतळावर  पोहोचले असून तेथील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) झोडपून काढले आहे. एवढेच नव्हे तर, परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे आज औरंगाबाद येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन पिकाच्या नुकसानाचे आकलन करणार आहेत.महत्वाचे म्हणजे, आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील अशी अपेक्षा केली जात आहे. भाजप-शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन वाद पेटला आहे. तसेच आज सत्तास्थापने संदर्भात काही निर्णय घेण्यात येतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

एएनआयचे ट्विट-