Shiv Sena: तर शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकते; एकनाथ शिंदे गटातील मंत्र्याचे सूचक विधान
Deepak Kesarkar | (Photo Credit - Twitter)

[Poll ID="null" title="undefined"]एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार आणि नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस असून त्यांच्यात काही मुद्द्यांवरुन वादाची ठिणगीही पडल्याचे बोलले जात आहे. त्यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आत्मपरिक्षण केले तर शिवसेना (Shiv Sena) पुन्हा एकत्र येऊ शकते असे विधान शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहे. या विधानावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहेत.

अधिवेशन काळात विधानपरिषद उप-सभापती निलम गोऱ्हे यांच्या दालनात उद्धव ठाकरे आणि मंत्री दीपक केसरकर आमनेसामने आले. शिंदे गाटातील आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याची ही पहिलीच वेळ होती. या वेळी उद्धव ठाकरे यांनी आम्ही आपल्याला मोठे केले, इतके सगळे दिले. तरीही आपण आमच्याशी इतके वाईट का वागता आहात? असा थेटच सवल केला. यावर दीपक केसरकर काहीच बोलले नाहीत. दरम्यान, यावर आपण लवकरच याबाबत भूमिका स्पष्ट करु असे दीपक केसरकर म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion: निष्ठावंतांनो फक्त पक्षकार्य करा, आयारामांच्या गळ्यात मंत्रिपदाच्या माळा; एकनाथ शिंदे सरकारचा थाटच न्यारा)

अधिवेशन काळात विरोधकांनी केलेल्य विविध आरोपांवरुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत सापडले. एकट्या पडलेल्या अब्दुल सत्तार यांनी त्यानंतर थेट स्वकीयांवरच हल्ला चढवला. आमच्यातीलच काही लोक माझ्यावरील आरोपांना आणि माझ्या विरोधात खतपाणी पुरवत आहेत. याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. कारवाईची वाट पाहतो आहे असे सत्तार यांनी म्हटले. सत्तार यांच्या विधानानंतर शिंदे गटातूनही प्रतिक्रिया आल्या. जर काही समज-गैरसमज असतील तर हे बसून मिटवले पाहिजेत. असे जाहीरभाष्य करु नयेत, अशा प्रतिक्रिया शिंदे गटातील नेत्यांनी दिल्या. दरम्यान, या मुळे शिंदे गटातही सर्वच काही अलबेल नसल्याचे पुढे आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.