पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार, विरोधकांचेही टीकास्त्र
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी | (Photo courtesy: Archived, Edited Images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात प्रामुख्याने ते कल्याण-भिवंडी (Kalyan-Bhiwandi) आणि पुणे (Pune) मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन (Metro Project) करणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमावर भाजपचा सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेना (Shiv Sena) अनुपस्थिती राहणार असल्याचे समजते. प्राप्त माहिती अशी की, सत्तेत सहभागी मित्रपक्ष असल्यामुळे प्रोटोकॉलनुसार शिवसेनेला निमंत्रण मिळायला हवे. मात्र, या कार्यक्रमाचे निमंत्रण शिवसेनेला मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेना या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहे.

ही तर केवळ जनतेची दिशाभूल - राष्ट्रवादी

दरम्यान, शिवसेनेने पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असला असतानाच विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावरच टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधानांचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ जनतेची फसवणूक आहे. आतापर्यंत भिवंडी-कल्याण या मेट्रोसाठी निविदाच काढण्यात आली नाही. तर, केवळ भूमिपूजन करुन काय उपयोग असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. दरम्यान, केवळ भाजप खासदाराचा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मेट्रोची मार्गिका तयार करण्यात आली आहे. मात्र प्रवासी संख्येच्या दृष्टिकोनातून ही मार्गिका चुकीची असल्याचा आरपो करत हा प्रकल्प तोटय़ाचा ठरणार असल्याचा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. दरम्यान, मेट्रोची मार्गिका भिवंडीकडे वळवत भाजपने शिवसेनेवर कुरुघोडी करण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही राष्ट्रवादीने केली आहे. (हेही वाचा, पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात : कल्याण मेट्रो भूमिपूजनासह, पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करणार)

पंतप्रधा नरोंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील दिवसभरातील कार्यक्रम

हवाई दलाच्या विशेष विमानाने सकाळी दहाच्या सुमारास मुंबई विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होईल. विमानतळावर आगमन झाल्यावर ते हेलिकॉप्टरने कुलाबा येथील आयएनएस शिक्रा या नौदलाच्या तळावर उतरतील. त्यानंतर ते साडेअकराला राजभवनवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवणार आहेत. या कार्यक्रमात ‘टाइमलेस लक्ष्मण’ या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. राजभवनातील कार्यक्रम आटोपल्यावर कल्याणकडे रवाना होतील. कल्याणच्या फडके मैदानात मोदींच्या हस्ते मेट्रो आणि गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन होईल. त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होतील. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात आयोजित सोहळ्यात पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन झाल्यावर पंतप्रधानांचे महाराष्ट्रताील कार्यक्रम संपतील. सर्व कार्यक्रम आटोपल्यावर राजधानी दिल्लीकडे रवाना होतील.