Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सुरु असलेला वाद, राज्यपालांची भूमिका, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घेतलेला निर्णय या सर्व प्रकारांवरुन सुरु असलेला सत्तासंघर्ष न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हे प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणावर दोन सुनावण्या पार पडल्या आहेत. तिसरी सुनावणी 12 ऑगस्टला होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी आता पुढे ढकलली आहे. या प्रकरणावर आता 22 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे 'तारीख पे तारीख' देण्यामागचे नेमके कारण काय? याबाब त अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 8 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाने ही सुनावणी अचानक पुढे ढकलली. आता ही सुनावणी 12 ऑगस्टला होईल असे सांगितले आणि आता तर तब्बल 10 दिवसांनी ही सुनावणी पुढे ढकलत 22 ऑगस्टची तारीख दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासत पहिल्यांदाच अशा प्रकारची कायदेशीर गुंतागुंत आणि घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. अशा वेळी न्यायालय नेमका काय निर्णय देते किंवा आदेश देते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठक झाली, खातेवाटप मात्र गुलदस्त्यात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मौन कायम)

न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेना कोणाची? या प्रश्नाचे उत्तर शोधले जाणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि राजकीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसह देशभरातील नागरिकांमध्येही या प्रकरणाबातब जोरदार उत्सुकता आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश एन व्ही रमण्णा यांच्यासमोर होत आहे. महत्त्वाचे म्हणजे सरन्यायाधीश एन. व्ही रमण्णा हे येत्या 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. सुनावणीदरम्यान एन व्ही रमण्णा यांनी सुनावणीदरम्यान, अनेक ताशेरेही ओढले होते. त्यामुळे आता पुढे काय होणार याबाबत उत्सुकता आहे.