Shiv Sena: शिवसेना सक्रीय; 14 एप्रिलला बीकेसी, 8 जूनला औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा
Uddhav Thackeray | (Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Uddhav Thackeray) यांची औरंगाबाद (Aurangabad) येथे जाहीर सभा उद्या म्हणजेच एक मे रोजी पार पडत आहे. शिवाजी पार्क येथील सभेनंतर राज ठाकरे यांनी ठाणे येथे सभा घेतली. या सभेनंतर त्यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा आयोजित केली. राज यांच्या सभांच्या जोरदार चर्चा सुरु असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही जाहीर सभा होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभांबाबत शिवसेनेने (Shiv Sena) जाहीर केले आहे. त्यानुसार मुंबई येथील बीकेसी (BKC) येथे 14 मे तर 4 जून रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे. त्यामुळे या दोन्ही सभांतून मुख्यमंत्री काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिवसेना आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक आजच पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्युअल पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना या बैठकीबाबत माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुखांनी राज्यभरातील शविसैनिकांना संघटना बांधणीबाबत संदेश दिला. आपण कोणावर हल्ला करायचा नाही. मात्र जर आपल्यावर हल्ला होत असेल तर आपल्याला प्रतिहल्ला करावा लागेल. ढोंगाचे बुरखे फाडावे लागतील. आज जे बनावटी हिंदुत्त्ववादी आले आहेत. डुप्लिकेट. त्यांच आपल्याला काहीही आव्हान नाही. शिवसेना लढेण. येत्या 14 तारखेला बीकेसीमध्ये शिवसेनेची सभा आहे. त्यानंतर औरंगाबाद येथेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आहे. ही सभा 8 जून रोजी पार पडेल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी संकल्प व्यक्त केला आहे. (हेही वाचा, Raj Thackeray: औरंगाबाद येथील सभेपूर्वी राज ठाकरे यांना पुण्यातील पुरोहितांकडून वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे आशीर्वाद)

दरम्यान, शिवसेनाप्रमुखांच्या संदेशाबाबत विचारले असता संजय राऊत यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, ही पक्षाची अंतर्गत बैठक होती. मात्र, पक्षप्रमुखांनी अनेक विषयांवर सडेतोड भाष्य केले आहे. ते आक्रमकपणे बोलले. त्यामुळे आगामी काळात अनेक स्फोट होऊ शकतील. ज्यांना स्वत:चे हिंदुत्व नाही. ते इतरांकडून नकली बुस्टर डोस घेत आहेत. त्यांना नवहिंदुत्वाचा बुष्टर डोस घ्यावा लागत असल्याचा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.