Bhojan | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

आतापर्यंत 10 रुपयांत मिळणारी शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) आता केवळ 5 रुपयांना मिळणार आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) अशा दुहेरी पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ (Minister of Food and Civil Supplies Chhagan Bhujbal) यांनी ही माहिती दिली. राज्यातील मजूर, गरीब जनता, घराबाहेर राहणारे विद्यार्थी आदी लोकांना भोजन मिळावे यासाठी तालूका स्तरावरही शिवभोजन थाळी उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे. त्यानुसार दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत 1 लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊन काळात सर्व काही बंद असल्यामुळे राज्यातील अत्यावश्यक सेवांवर ताण निर्माण झाला आहे. इतका की, राज्यातील अनेक नागरिकांना जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे. प्रसारमाध्यमांतूनही त्याबाबत अनेकदा चर्चा झाली. त्यामुळे या नागरिकांना आता जेवनासाठी शिवभोजन थाळी उपक्रम अधिक व्यापक पातळीवर सुरु करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. शिवभोजन थाळी ही शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारचा महत्तवपूर्ण उपक्रम. राज्यातील गरीब जनतेला पोटभर अन्न माफक दरात उपलब्ध व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. (हेही वाचा, शिवभोजन थाळी: तुमच्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मिळणार 10 रुपयांत जेवण)

दरम्यान, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू योग्य दरात आणि पुरेशा प्रमाणात मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी राज्य सरकारने काही हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करुन दिले आहेत. नागरिकांना काही समस्या, तक्रारी, सूचना करायच्या असल्यास हे फोन क्रमांक पुढीलप्रमाणे-

  • ·         संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव-  9870336560
  • ·         अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी- 9766158111
  • ·         महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी- 7588052003
  • ·         महेश पैठणकर-स्वीय सहाय्यक- 7875280965

प्राप्त माहितीनुसार, शिवभोजन थाळी उपक्रमाची संख्या पाच पटींनी वाढविण्यात आली आहे. शहरी भागात प्रती 45 रुपये तर ग्रामीण भागात प्रती थाळी 30 रुपये दराने शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने 160 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे आजघडीला राज्यातील नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्याची उत्पादकता शून्य झाली आहे. अशा स्थिती त्याची उपासमार होण्याची अधिक शक्यता आहे. ही शक्यता टाळण्यासाठीच शिवभोजन थाळी उपक्रम विस्तारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दरम्यान, शिवभोजन थाळी केंद्रांमध्येही आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी दोन ग्राहकांमध्ये किमान तीन फूट अंतर राखणे. गर्दी टाळणे. हात धुणे. त्यासठी साबन आणि पाणी उपलब्ध करुन देणे. भोजनालयातील कर्मचाऱ्यांना मास्क उपलब्ध करुन देणे. भटारखाण्यात स्वच्छता राखण्याबाबत काळजी घेण्यात येत आहे.