Shirish Valsangkar | X @NarendraKale5

सोलापूर मध्ये प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने वैद्यकीय क्षेत्रासोबत सारं सोलापूर हादरलं आहे. आता या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट समोर आला आहे. डॉ. वळसंगकर यांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आत्महत्येला एक महिला जबाबदार असल्याची बाब समोर आली आहे. ही महिला वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असलेली मनीषा मुसळे-माने आहे. सध्या पोलिस स्टेशन मध्ये मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. नक्की वाचा: Shirish Valsangkar Suicide: सोलापूर मधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या; सामान्य नागरिकापासून हॉस्पिटल कर्मचार्‍यांनी व्यक्त केली हळहळ. 

डॉ. वळसंगकर मनीषा मुसळे-माने मुळे तणावात?

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूर मध्ये S P Institute of Neurosciences हे हॉस्पिटल उभारलं आहे. या हॉस्पिटल मध्ये त्यांना सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्री हवे होते. तसा त्यांचा आग्रहच होता. पण सध्या हॉस्पिटल मध्ये रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. जी महिला अशी रक्कम स्वीकरत होती त्यांना डॉ. वळसंगकर यांनी कामावरून काढून टाकले होते. नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, डॉक्टरांना ते मान्य नव्हते. या प्रकरणामुळे डॉ. वळसंगकर तणावाखाली होते त्यामधूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं सांगितलं जात आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवार 18 एप्रिलच्या रात्री राहत्या घरी डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर तातडीने त्यांना स्वतःच्याच रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या या आत्महत्येप्रकरणी पोलिस तपास आणि चौकशी सुरू आहे.