Coronavirus चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. गर्दी च्या ठिकाणी हा संसर्गजन्य रोग पसरण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, मंदिरे, काही ऑफिसेस बंद ठेवण्यात आली आहे. मात्र गर्दी होणार नाही याची काळजी घेत शिर्डीचे साईबाबा मंदिर (Shirdi Saibaba Temple) आणि कोल्हापूरचे अंबाबाई चे मंदिर (Kolhapur Ambabai Temple) दर्शनासाठी खुलेच ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. या मंदिरात दूरवरुन लोक मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी येतात. अशावेळी मंदिर बंद असल्याकारणाने त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या मंदिरात भाविकांसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत जेणेकरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखता येईल.
कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाईच्या मंदिरात तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र सध्या कोरोना व्हायरस फैलावत असल्यामुळे ही संख्या रोडावली आहे. तरीही थोड्या फार प्रमाणात का होईना भाविक दर्शनासाठी येतच आहे. अशा वेळी मंदिर बंद ठेवणे हे मंदिर प्रशासनाला अयोग्य वाटले. म्हणून त्यांनी काही अटी घातल्या आहे. मुंबई: 'कोरोना व्हायरस'च्या भीतीने श्री सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद; वैद्यकीय मदत कक्ष मात्र सुरु राहणार
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातील अटी:
जर 20 पेक्षा जास्त भाविक रांगेत असतील तर एका वेळी 20 भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे,' अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर सॅनीटायझर सुविधा देण्यात आली आहे. भाविकांनी मास्क लावून मंदिरात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शिर्डीच्या साई बाबा मंदिरातील अटी:
या मंदिरात भाविकांना आरतीला उपस्थित राहण्यासाठी देण्यात येणारे पास बंद करण्यात आले आहेत. मात्र, दर्शनासाठीचे पास सुरूच राहतील आणि मंदीरही खुलेच राहणार आहे.
त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेचा मान राख हा निर्णय घेण्यात आला असल्या कारणाने भाविकांनीही गर्दी न करता मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.