शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर मागीलवर्षी प्रमाणे यंदाही दोन दसरा मेळावे (Dasara Melava) होणार आहे. ठाकरे गट शिवाजी पार्क वर तर शिंदे गट आझाद मैदानावर दसरा मेळावा घेणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून तयारी सुरू आहे. दरम्यान शिंदे गटाने आज त्यांच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी केला आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या भाषणाच्या क्लिप ने त्याची सुरूवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा टीझर ' शिवसेनेचं एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व !' म्हणत शेअर केला आहे. Shiv Sena Dasara Melava 2023: चलो, शिवतिर्थ! यंदा शिवाजी पार्कवरचं होणार उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा .
पहा टीझर
View this post on Instagram
24 ऑक्टोबर दसरा दिवशी दक्षिण मुंबईच्या आझाद मैदानावर शिंदे गटाचा हा दसरा मेळावा पार पडेल. मागील वर्षी हा दसरा मेळावा बीकेसी ग्राऊंडवर झाला होता. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी होत मागील काही तासांतच ठाकरेंचे दोन निकटवर्तीय शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत. आता आगामी निवडणूकांच्या काळासाठी या दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे उपस्थितांना काय संबोधित करणार? कोणावर टीकेची झोड उठवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
शिवाजी पार्क साठी शिंदे गटानेही अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी तो मागे घेतला आणि दक्षिण मुंबईत आता सभेची जागा निश्चित केली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी विजया दशमी दिवशी 'दसरा मेळवा' घेण्याची प्रथा सुरू केली होती. त्यांचं भाषण मुंबई मध्ये ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी त्या दिवशी शिवाजी पार्क वर येत होती. आता हीच गर्दी खेचण्याची स्पर्धा ठाकरे आणि शिंदे गटामध्ये दिसत आहे.