Shiv Sena Dasara Melava 2023: यावर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार आहे. शिंदे गटाने मैदानासंदर्भात महापालिकेकडे केलेला अर्ज आता मागे घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून दसरा मेळावा शिवतिर्थावरचं होणार असल्याचं म्हटलं आहे. 'वाजत गाजत गुलाल उधळत जायचंय, साहेबांना दिलेलं वचन पूर्ण करायचंय! चलो, शिवतिर्थ!', असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)