Ganpatrao Deshmukh | (Photo Credit : Facebook)

शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशमुख यांच्यावर 15 जुलैपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर होता. साधी रहाणी असणारे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे नेते म्हणून मा. गणपतराव देशमुख यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने राजकीय विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.  गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला.

ज्या काळात शिक्षणासाठी वणवण भटकावे लागायचे अशा काळात गणपतराव देशमुख यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. ते वकील झाले. वकिलीची पदवी असताना आणि पदवीच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावता येण्यासारखी संधी असतानाही गणपतरावांना तो मोह आवरला नाही. विद्यार्थी दशेपासून सुरु असलेले शेतकरी कामगार पक्षासोबतचे काम त्यांनी कायम ठेवले. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर सांगोला विधानसभा मतदारसंघातून 1962 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. एकदा आमदार झाल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक निवडणुकांचा अपवाद वगळता सलगपणे 54 वर्षे ते विधानसभेवर निवडूण येत राहिले.

गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून 11 वेळा निवडूण येण्याचा विक्रम केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील ते सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून ओळखले जात. सलग दहावेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे ते देशातील दुसरे आमदार ठकरे. सर्वाधिक वेळा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम करुणानिधी यांच्या नावावर आहे. (हेही वाचा: Maharashtra Flood: राज्यात पुराचा तडाखा बसलेल्या भागात वीज बिलाच्या वसूलीसाठी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून स्थगिती)

अनेक वर्षे सगलपणए आमदार असूनही गणपतराव देशमुख यांना कधी सत्तेचा मोह झाला नाही. शरद पवार यांच्या पुलोद सरकारचा अपवाद वगळता ते नेहमी विरोधी बाकावरच राहिले. 1978 मध्ये पुलोद सरकारमध्ये ते मंत्रिमंडळात होते. तर 1999 मध्येही शेकापणे काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला. तेव्हाही गणपतराव देशमुख मंत्रिमंडळात होते. हे दोन अपवाद वगळता गणपतराव नेहमीच विरोधी बाकांवर राहिले.