
Maharashtra Flood: महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुराचा मोठा प्रमाणात राज्याला फटका बसला आहे. अनेकांची घरे उद्धवस्त होण्यासह काहींना आपल्या जवळच्या व्यक्तीला या पुराच्या परिस्थितीत गमवाले लागले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेतेमंडळी आता पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पुरग्रस्तांना दिलासा मिळेल अशी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार नितीन राऊत यांनी असे म्हटले आहे की, पुराचा तडाखा बसलेल्या भागात वीज बिलाच्या वसूलीसाठी स्थगिती देण्यात यावी.
नितीन राऊत यांनी असे म्हटले आहे की, पुराची परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी नागरिकांकडून वीज बिल वसूल करु नका. तसेच पुरग्रस्त भागातील स्थिती पुर्ववत झाल्यानंतर बिल भरण्यासाठी सुद्धा नागरिकांना सवलत दिली जाईल असे ही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.(Maharashtra Flood: भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला-आशिष शेलार)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच पुरग्रस्त भागाचा दौरा करत पुरग्रस्तांना आधार दिला आहे. याच पार्श्वभुमीवर आता राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुरग्रस्त नागरिकांना 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचसोबत दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये दिले जातील असे ही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.पुरामुळे फटका बसलेल्यांची यादी महिन्याभरातच तयार केली जाणार आहे. त्यानुसार जे बाधित आहेत त्यांना जमिन आणि एका वर्षाच्या आतमध्ये त्यांचे पुर्नवसन केले जाणार आहे. पुरामध्ये जखमी झालेल्यांचा संपूर्ण खर्च सरकारकडून केला जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे