Indrani Mukerjea (Photo Credit - Twitter/ANI)

हायप्रोफाईल शीना बोरा हत्या प्रकरणात (Sheena Bora Murder Case) आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukerjea) हिस विशेष सीबीआय न्यायालयाने (Special CB Court) जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर होताच ती भायखळा कारागृहातून Byculla Jail) बाहेर पडली. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झाला आहे. या वेळी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मोजक्याच प्रतिक्रियेत ती म्हणाली 'मी खूप आनंदी आहे'. शीना बोरा प्रकरणात इंद्राणी मुखर्जी मुंबईतील भायकळा कारागृहात 2015 पासून तब्बल 6 वर्षे बंद होती. तिच्यावर आपली मुलगी शीना बोरा हिची हत्या केल्याचा आरोप आहे.

शीना बोरा हत्याकांड देशात सर्वाधिक चर्चा झालेल्या काही मोजक्याच प्रकरणांपैकी एक आहे. ज्यात बहुचर्चीत असलेल्या इंद्राणी मुखर्जी आणि तिचा पती राहिलेल्या पीटर मुखर्जी यांचे नाव पुढे आले होते. हे जोडपे भारतातील खासगी प्रसारमाध्यमांतील एक प्रमुख हस्ती म्हणून ओळखले जात असे. अनेक प्रसारमाध्यम कंपन्यांचे स्टार्टअप आणि वाहिन्यांचा बाजारपेठेत जम बसवून देण्यात पीटर मुखर्जी आणि नंतर इंद्राणी मुखर्जी यांचा सहभाग होता. या हत्याकांडात नात्यांचा एक असा गुंता होता ज्यात विश्वासघात, धका आणि खोटेपणा खोटेपणातून निर्माण झालेले नाते आणि त्या नात्याला लपविण्यासाठी सुरु झालेले हत्याकांड असे विविध पैलू होते. (हेही वाचा, Sheena Bora Murder Case: 'शीना बोरा जीवंत, कश्मीर मध्ये तपास करा' CBI ला Indrani Mukerjea चं पत्र - रिपोर्ट्स)

ट्विट

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होत राहिले. ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मुंबईतील हायप्रोफाईल सोसायटीत झालेल्या या हॉरर किलींगचे हे पहिलेच प्रकरण मानले जाते. यात एक एका आईलाच आपल्या मुलीची हत्या करावी लागली कारण ती मुलगी ज्या मुलावर प्रेम करत होती तो मुलगा नात्याने तिचाच सावत्र भाऊ होता.