Sanjay Rathod and Sharmila Thackeray (Photo Credits: Twitter/FB)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी समोर आलेले नाव वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर विरोधी पक्षांकडून टिका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर आणखीनच हे प्रकरण चिघळत चालले आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांना संजय राठोड यांच्यावर कारवाई व्हावी का? असा प्रश्न मिडियाने विचारल्यानंतर त्यांनीही या प्रकरणावर आपले मत मांडले. आज मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे घेण्यात आलेल्या स्वाक्षरी कार्यक्रमात त्या राज ठाकरे यांच्यासहित उपस्थित होत्या.

शर्मिला ठाकरे यांना यावेळी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "हा प्रश्न चुकीच्या माणसाला विचारताय आम्ही सरकारमध्ये नाही पण, महिला म्हणून अशा प्रकरणामध्ये कारवाईची गरज आहे असं वाटतं." असं त्या म्हणाल्या.हेदेखील वाचा- भाजप नेत्या Chitra Wagh यांचे पती Kishor Wagh यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल

"तसं पाहिलं तर राज्यात अनेक अत्याचाऱ्याच्या घटना घडतात, सगळीकडे कारवाईची गरज आहे. हे प्रकरण लावून धरल्यामुळे खास करुन मीडियाचे आभार," असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर (Kishor Wagh) वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता या प्रकरणी किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.