Sharad Pawar | Twitter /ANI

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (15 ऑगस्ट) लाल किल्ल्यावरून भाषण करताना 'मी पुन्हा पुढील वर्षी येईन' असा विश्वास बोलून दाखवला आहे. या विधानाची आज शरद पवारांनी (Sharad Pawar) खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावानुसार 'मी पुन्हा येईन' असं म्हटलं आहे. पण देवेंद्र फडणवीस एक पद खाली पुन्हा आले. आता नरेंद्र मोदी कोणत्या पदावर पुन्हा येणार हे पहावं लागेल असं म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सुमारे दीड तास लाल किल्ल्यावर भाषण केले. हे भाषण आतापर्यंतचे मोठे भाषण होते. यामध्ये मणिपूर सह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणं गरजेचे असताना मोदी इतरच विषयांवर बोलल्याचे पवार म्हणाले आहेत. मणिपूर  मध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेथिल जनतेला विश्वास देणं गरजेचे आहे पण पंतप्रधानांना हा विषय महत्त्वाचा वाटत नसावा असं शरद पवार म्हणाले आहेत. देशातील सध्याचं वातावरण भाजपाच्या बाजूने नसल्याचं आपल्याला वाटत असल्याचंही ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Lok Sabha Elections: माढा लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपण्याची शक्यता; पुढील खासदार कॉंग्रेसचा असेल - पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा.

एनसीपी मधील फूटीनंतर शरद पवार येवल्यानंतर आता बीड मध्ये सभेला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी आज त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी स्वतःला, लेक सुप्रिया सुळे यांना, जयंत पाटलांना मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. तसेच पुण्यातील कार्यक्रमही पूर्वनियोजित होता. असं म्हणत संभ्रमाच्या वातावरणाच्या वृत्ताचाही इन्कार केला आहे.