NCP Chief Sharad Pawar with Maharashtra CM Uddhav Thackeray (Photo Credits: IANS)

Sharad Pawar Meets CM Uddhav Thackeray: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ते त्यांच्या निलंबनापर्यंतचे पडसाद सर्वत्र उमटल्याचे दिसून येत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांचे खाते बदल करण्यात येण्याबद्दल बैठकीवेळी चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर सचिन वाझे यांच्यावरुन सुद्धा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केल्याचे दिसून आले.(Sachin Vaze Suspend: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या मंत्र्यांना खातेबदलासंदर्भात आजच कळवले जाणार आहे. त्यामुळे कोणाला कोणते खाते दिले जाणार किंवा कोणाला पदावरुन काढले जाणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या मंत्र्यांची एक महत्वाची बैठक सुद्धा मुंबईत बोलावली आहे.

तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण ते आता पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन यापर्यंतच्या सर्व काही गोष्टींमुळे महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. तर विरोधकांनी तर महाविकास आघाडी सरकारवर विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी सुद्धा फैलावर घेतल्याचे दिसून आले होते. (Sachin Vaze Arrested: सचिन वाझे यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक)

दुसऱ्या बाजूला वाझे यांना NIA कडून अटक झाल्यानंतर शिवसेनेने सामना मधून टीका केली आहे. त्यात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र पोलीस दलाची क्षमता व शौर्य याची वाहवा जगभरात असताना 20 जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे हे आश्चर्यच आहे. सचिन वाझे यांचे काही चुकलेच असेल व 20 जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्री तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून केले जात आहे. वाझे यांना अटक करुन दाखवली. याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत.