SP Symbol | Twitter /PTI

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं रायगडावर आज (24 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपलं नवं पक्षचिन्ह 'तुतारी वाजवणारा माणूस'(Man Blowing Turha) चं दणक्यात लॉन्चिंग केलं आहे. या सोहळ्यासाठी 84 वर्षीय शरद पवार (Sharad Pawar) 40 वर्षांनी रायगडावर (Raigad) आले. रायगडावर येण्यासाठी त्यांना डोलीने आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शरद पवार यांच्यासोबत पक्षाचे आमदार, खासदार, स्थानिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. तुतारी फुंकत त्यांनी पक्षचिन्ह स्विकारलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह काही दिवसांपूर्वी बहाल केले आहे. आता या नव्या पक्ष चिन्हासह शरद पवार आगामी निवडणूकांना सामोरे जाणार आहेत. Sharad Pawar Party Symbol: 'वाजवा तुतारी हटवा गद्दारी', शरद पवार यांच्या निवडणूक चिन्हाचा सोशल मीडियावर आवाज, सुप्रिया सुळे यांनी सांगितली त्रिसूत्री .

शरद पवारांकडून पक्ष चिन्हाचं लॉन्चिग

शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शरद पवार यांनी आक्षेप घेत न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याबाबतची सुनावणी सुरू आहे. मात्र तोपर्यंतच्या निवडणूकीसाठी शरद पवारांना नवं पक्ष चिन्ह वापरावं लागणार आहे.

सध्या शरद पवार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा भाग आहेत. कॉंग्रेस सह उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत ते आगामी निवडणूकांना सामोरे जाणार आहेत. लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र सामोरी जाणार आहे.