एक शरद, सगळे गारद : संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा भाग तीन इथे पाहा
Sharad Pawar and Sanjay Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Sharad Pawar interview With Sanjay Raut Part 3: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक दीर्घ मुलाखत घेतली. जी एकूण 3 भागांमध्ये प्रसारीत झाली. आज या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग प्रसारीत झाला. या मुलाखतीचा शेवटचा भाग आपण इथे पाहू शकता. एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली ही मुलाखत प्रदर्शित करण्यात आली. आज सकाळी नऊ वाजता या मुलाखतीचा तीसरा भाग प्रदर्शित झाला.

संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत अनेक अर्थांनी गाजत आहे. शरद पवार यांनी या मुलाखतीत राजकारण, समाजकारण आणि विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार यावर भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन या आधीच ही मुलाखत स्फोटक असल्याचे म्हटले होते. प्रसारमाध्यमांतूनही त्याची जोरदार चर्चा झाली होती. महत्त्वचे असे की, ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर खरोखरच ती स्फोटक असल्याचे पुढे आले आहे. (हेही वाचा, भारताची कोसळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणखी एका मनमोहन सिंग यांची गरज; 'एक शरद सारे गारद' मध्ये पवारांची फटकेबाजी )

एक शरद, सगळे गारद मुलाखत भाग 3

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रदर्शित होणार आहे. पवारांनी ‘सामना’ला नुकतीच एक विशेष मुलाखत दिली असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक म्हणून ही मुलाखत घेतली आहे. शनिवारी प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागामध्ये पवारांनी करोनापासून ते राज्यातील राजकारणासंदर्भात वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. तर दुसऱ्या भागामध्ये पवारांनी प्रामुख्याने राज्यातील राजकारणाबरोबरच देशातील राज्यकारणावर भाष्य केलं. आजच्या मुलाखतीमध्ये पवार विरोधकांचा समाचार घेणार की भविष्यातील भूमिका स्पष्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी नऊ वाजता या मुलाखतीचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली ही मुलाखत प्रदर्शित करण्यात येत आहे.